• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

admin by admin
April 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान  समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे,असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले,भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे. या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.  बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

Previous Post

शिधावाटप विभागाचा धडाका! वैजापूर रोडवर एलपीजी चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION