मुंबई : रमजान ईदचा गोडवा वाढविण्यासाठी एअर इंडियाने शनिवार, २० मार्च रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये प्रवाशांना शीर खुरमा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा सर्व केबिन क्लासमध्ये आणि एअर इंडियाच्या नेटवर्कमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतातून सुटणारी सर्व विमाने, देशांतर्गत मार्ग आणि परतीच्या केटर्ड सेक्टर्समध्ये ईदनिमित्त प्रवाशांना शीर खुरमा देण्यात येणार आहे. ज्या विमानांमध्ये एकापेक्षा जास्त जेवणाची सुविधा आहे, तिथे मुख्य जेवणामध्ये शीर खुरमा समाविष्ट करण्यात आले आहे, तर अल्पोपाहार सेवा नियोजित मेन्यूनुसार सुरू राहणार आहे. हा उपक्रम ताजसॅट्स, ओबेरॉय फ्लाईट सर्व्हिसेस, कॅसिनो एअर केटरर्स अँड फ्लाईट सर्व्हिसेस (सीएएफएस) आणि ॲम्बेसेडर्स स्काय शेफ (एएससी) यांसारख्या सर्व केटरिंग भागीदारांमार्फत राबवला जात आहे. गुढी पाडव्यानिमित्त गुरुवारी मुंबईतील अदानी लाउंजमध्ये श्रीखंड, चॉकलेट पेडा, नारळाची बर्फी, मावा मोदक आणि गुजिया प्रवाशांना देण्यात आल्या. याव्यतिरिक्त लाउंजमध्ये रमजान ईदनिमित्त शनिवारी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी दाल घोस्ट, मलाई चिकन गिलाफी कबाब, कच्ची मुर्ग बिर्याणी, पनीर रेशमी हंडी, शाही तुकडा, बकलावा, फिरनीचा आस्वाद प्रवाशांना घेता येणार आहे.
विमानातील सेवेसोबतच दिल्ली आणि मुंबईतील विमानतळांवरील लाउंजमध्येही विशेष खाद्यपदार्थांची रेलचेल असेल :
- मुंबई (अदानी लाउंज) : २१ मार्च रोजी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात दम घोस्त, कच्ची मुर्ग बिर्याणी, मलाई चिकन गिलाफी कबाब, शाही तुकडा, फिरनी आणि बाकलावा यांसारखे पदार्थ दिले जातील.
- दिल्ली (महाराजा लाउंज) : प्रवाशांच्या विनंतीनुसार नवरात्रीनिमित्त विशेष ‘सात्त्विक थाळी’ देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामध्ये साबुदाणा खिचडी, पनीरची भाजी आणि खीर यांचा समावेश आहे.







