• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब

हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी नाशिककर भारावले

admin by admin
January 24, 2026
in नाशिक, राष्ट्रीय
0
नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात आज भरदुपारी सुर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटीक शोचे. या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले. याबरोबरच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने गंगापूर धरण परिसर आज दुपारी दुमदुमला. तसेच सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करीत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार मानले. भारतीय वायूदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसीय एरोबॅटिक शो आज दुपारी गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल (जालना), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त), ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी आज दुपारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. धरणाच्या सभोवताली नागरिक उपस्थित होते. हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, श्री. विष्णू, अंकित वशिष्ट, संजय सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह, अभिमन्यू त्यागी यांनी वायू दलातील हॉक १३२ या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वाय, मिग विमान, बाण, प्रेमाचे प्रतिक साकारत नाशिककरांना समर्पित केले. तत्पूर्वी देशभक्तीपर विविध गीतांमुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी, नाश्ता, स्वच्छता, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्र, स्वयंसेवक, लाइफ जॅकेट, थ्रो बॅग्जसह आवश्यक साधने, उपकरणांनी सज्ज होता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते. तर कार्यक्रमापूर्वी ऑल्मपिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकानयनची प्रात्यक्षिके सादर केली. मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, डोळ्यांचे पारणे फेडणारा अशा एरोबॅटिक शोसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण होऊन ते सैन्य दलात भरतीसाठी प्रवृत्त होतील. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याची ही पूर्वतयारी म्हटली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, नाशिक शहरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नाशिकच्या वैभवात भर पडून नाशिकचा नावलौकिक उंचावणार आहे.

Previous Post

बाळासाहेबांसारखं राजकारण करणं कोणालाच जमणार नाही! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Next Post

मुंबईकरांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठी भेट! हार्बर मार्गावर धावणार १४ नवीन एसी लोकल

admin

admin

Next Post
मुंबईकरांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठी भेट! हार्बर मार्गावर धावणार १४ नवीन एसी लोकल

मुंबईकरांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठी भेट! हार्बर मार्गावर धावणार १४ नवीन एसी लोकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION