मुंबई : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे मुंबई येथे आज रात्री आगमन झाले. विमानतळ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह हे २९ आणि ३० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते लालबागच्या राजा आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन गणेशाचे दर्शन घेणार आहेत.







