• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

admin by admin
August 4, 2025
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : गणेशोत्सव जवळ येत असतानाच मोठ्या मंडळाकडून गणेश मूर्तींची मिरवणूक काढून मुख्य मंडपात नेण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच विनापरवाना मिरवणूक काढून सार्वजनिक रस्ते बंद करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांवर उल्हासनगर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी ऐन सुट्टीच्या दिवशी मिरवणूक काढणाऱ्या उल्हासनगरचा विघ्नहर्ता आणि सेव्हन स्टार गणेश मित्र मंडळ या दोन मंडळाच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उल्हासनगर सध्या कोंडीचे केंद्रबिंदू ठरते आहे. शहरातील अरुंद रस्ते, त्यावर पडलेले खड्डे, वळणाच्या रस्त्यांवरती आणि मुख्य रस्त्यावर होणारी बेकायदा पार्किंग अशा विविध कारणांमुळे रस्ता रुंद झाला आहे. त्यात मालाची ने आण करण्यासाठी लहान मोठ्या ट्रक टेम्पो यांची कायमच शहरातल्या रस्त्यावरती लगबग असते. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीही होते. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय सुचवण्यासाठी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात विशेष बैठक पार पडली. त्यामध्ये विविध गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखा आणि पालिका अधिकाऱ्यांना दिले. त्यांचे नियोजन अद्याप होऊ शकलेले नाही. मात्र शहरात कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. उल्हासनगर शहर व्यापारी शहर आहे. सण उत्सवाच्या काळात आसपासच्या तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक ग्राहक उल्हासनगर खरेदीसाठी येत असतात. व्यापारी ही मोठ्या संख्येने शहरात येत असतात. अशा वेळेस सण उत्सवांच्या काळात उल्हासनगरात कोंडी अधिक वाढते. रविवारी अशीच कोंडी शहरात झाली होती. त्यातच उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात दोन गणेश मंडळांनी भव्य मिरवणूक काढत वाहतूक कोंडी केली.

उल्हासनगरचा विघ्नहर्ता आणि सेवेन स्टार गणेश मित्र मंडळ या दोन गणेश मंडळांनी गणेश मूर्ती आगमनाची विनापरवाना मिरवणूक काढली. यावेळी सार्वजनिक रस्ते बंद झाले. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मिरवणुकीत ढोल ताशे आणि इतर वाद्य वाजवून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचाही भंग केला, असा ठपका ठेवत उल्हासनगर पोलिसांनी या दोन गणेश मंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरवर्षी अशा मिरवणुकांवर कारवाई केली जाते.

Previous Post

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

शासनाकडून पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी २८ कोटींचा निधी केला मंजूर

admin

admin

Next Post

शासनाकडून पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी २८ कोटींचा निधी केला मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION