मुंबई : मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीचं इंजिन कर्जतमध्ये खराब झाल्यामुळे हा खोळंबा झाल्याचं माहिती मिळाली आहे. त्यामुळे सकाळी मुंबईकडे ) कामावर निघालेल्या नोकरदारांना चांगलाचं उशिर होणार आहे. दोन दिवसांपासून मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. प्रत्येकवर्षी पावसात ट्रेन गाड्या शिस्तीत चालवल्या जातात. आज इंजिन खराब झाल्यामुळे ट्रेनला गर्दी सुद्धा वाढली आहे. मालगाडीचं इंजिन बाजूला केल्यानंतर मध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत होईल.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पहिल्याचं पावसात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे. मुंबईकडे निघालेल्या मालगाडीचं इंजिन कर्जतमध्ये खराब झाल्यामुळे इतर गाड्यांना उशिर झाला आहे
सकाळी मुंबईत कामासाठी निघालेल्या नोकरदारांना याचा मोठा फटका बसला आहे. वेळेत ऑफिसला पोहोचता येणार नाही. पावसाळ्यात रेल्वे इंजिन खराब होण्याच प्रमाण अधिक असतं. त्यामुळे रेल्वेकडून अधिक काळजी सुध्दा घेतली जाते. मालगाडीचं इंजिन बाजूला केल्यानंतर वाहतुक सुरळीत होणार आहे. अचानक खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेला गर्दी वाढली आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.