मुंबई : मुंबईकरांना गेल्या 15 दिवसांपासून पाणीकपाताची सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी एक वेळ आणि कमी प्रमाणात मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात होता. भर उन्हाळ्यात पाणी कपात झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होतं होते. पण आता मुंबईकरांवरील हे पाणी संकट टळलं आहे. जल बोगद्याच्या दुरुस्तीमुळे मुंबईमध्ये पाणीकपात करण्यात आली होती. मात्र आता ही पाणी कपात मागे घेण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाकडून गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या जल बोगद्याचे काम सुरु होते. हे काम 31 मार्चपर्यंत सुरु होतं आणि जवळपास 30 एप्रिलपर्यंत हे काम सुरु राहणार होते. मात्र हे काम विक्रमीन वेळेत पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईचं पाणीपुरवठा 23 एप्रिल 2023 पासून पूर्ववत होणार आहे.