मुंबई : चोरडिया यांच्या घरी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाकेली. मी त्या बैठकीत नव्हते, त्यामुळे त्यात नेमकं काय झालं ते मला माहिती नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अनेकवेळा राजकीय मतभेद असतात. सरोज पाटील या शरद पवार यांच्या संख्या बहिण आहेत. अनेकवेळा त्यांचे पती एन डी पाटील आणि शरद पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पण नात्यात कधीहीअंतर पडले नाही, त्यामुळेकौटुंबीक नाती वेगळी आणि राजकीय मतेवेगळी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. अजितपवार यांनी चोरडिया यांच्या घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे महाविकासआघाडीतील घटक पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवरपत्रकारांनी सुळे यांना छेडले असता त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या आणि अजितदादांच्या जन्माच्या आधीपासूनचोरडिया आणि पवार कुटुंबाचे संबंध आहेत. चोरडिया आणि पवार कुटुंब यांचे अतिशयप्रेमाचे संबंध आहेत. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ झाला आमचे संबंध आहेत.यादोन कुटुंबातील व्यक्तिंनी भेटणे यात नवीन काही नाही.
चोरडिया यांच्या घरीझालेल्या चर्चेत मी नव्हते. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी कायचर्चा झाली याबाबत मला माहित नाही. लोकशाहीत अनेकदा मतभेत असतात, ते असलेच पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.राष्ट्रवादीकाँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे योगदान आयुष्यभर विसरणार नाही. राष्ट्रवादीकाँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची आज जयंती आहे. त्यानिमित्तराष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतरप्रसारमाध्यमांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. आर आर पाटील हे माझेज्येष्ठ बंधू होते. एकही दिवस असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही. आर आर पाटीलयांचे योगदान आयुष्यभर विसरणार नाही. सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची आठवणमहाराष्ट्र कायम लक्षात राहील असेही सुळे म्हणाल्या. आबा गेल्यानंतर वहिंनीनीजबाबदारी घेतली. रोहितच्या रुपाने आता नवे नेतृत्व पुढे येत असल्याचेही सुळेम्हणाल्या. नवाबमलिक हे सत्याच्या बाजून राहिलेला दृष्टा नेता आहे. नवाब मलिक यांच्यावर अन्यायझाला आहे. त्याच्याविरोधत ते मोठ्या हिंमतीन लढले. त्यांच्यावर राजकीय सुडानेकारवाई करण्यात आली. ते घरी आले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी खूप सहन केले आहे.दरम्यान, या काळात अनिल देशमुख आणि नवाबमलिकांच्या लेकी ज्या पद्धतीने लढल्या त्यांचा आम्हाला अभिमान आहे असेही सुप्रियासुळे म्हणाल्या…