मुंबई – ईडीने माजी आयकर अधिकारी आणि त्याच्या 2२ सहकाऱ्याना २६३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. तानाजी मंडल अधिकारी या माजी आयकर अधिकाऱ्याला भूषण पाटील आणि राजेश शेट्टी या त्याच्या सहकाऱ्यांना ईडीने अटक केली. आयकर विभागाच्या मुंबई कार्यालयात नियुक्ती असताना आरोपी तानाजी अधिकारी यांनी २६३ कोटी रुपयांचा टीडीएस परताव्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.
मुंबईतील न्यायालयाने तिघांना १० दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. यापूर्वी इडीने या प्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ६९.६५ कोटी रुपयांच्या ३२ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्यूरो सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यावरवर आधारित आहे. आरोपी अधिकारी आयकर विभागात २००७ ते २००९ या काळात वरिष्ठ कर सहाय्यक म्हणून कार्यरत असताना, इतरांच्या संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी अधिकाऱ्याने फसव्या पद्धतीने २६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त टीडीएस परताव्याची बनावट कागदपत्रे तयार केली तसेच.ही रक्कम चुकीच्या पद्धतीने आरोपी अधिकाऱ्याचे सहकारी असलेले भूषण पाटील यांच्या मालकीच्या कंपनीत हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआय अजून चौकशी करत आहेत.