मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात लव्ह जिहादवरुन वादविवाद सुरू आहे. लव्ह जिहाद विरोधात शिंदे-फडणवीस सरकारनेही कठोर पावलं उचलली आहे. यानंतर आता राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निघृण हत्या व हिंसांचाराविरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत पत्रकार परीषद घेवुन ही माहिती दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील मुलींना “युवती स्वसरंक्षण” देणार आहे. “युवती स्वसरंक्षण” राज्यातील प्रत्येक शाळांमधील मुलींना शिकवावे लागणार आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री यांना लगेच पत्र लिहिणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महिला बालविकास विभागामार्फत राज्यात “युवती स्वप्रशिक्षण” शिबिर सुरू केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक दिनानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार युवतींना हिंसाचाराविरुद्ध मनोबल उंचावण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार येणार आहे. सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्था सहाय्याने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्या येणार आहे. ३ जुलै ते १५ जुलै दरम्यान हे प्रशिक्षण राबवणार आहे. ही संस्था मोफत प्रशिक्षण देणार आहे. एसएनडीटी आणि मुंबई विद्यापीठांसोबत लवकरच लघु और मध्यम उद्यम मंत्रालय स्वाक्षरी करुन राज्यभर ही “युवती स्वसरंक्षण” मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.