पुणे : मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे अधिकारी आणि कर्मचारी, एसीपी वन हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत असताना रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत चार काडतुसे, दोन लोखंडी कोयते, कटावणी स्क्रू ड्रायव्हर आणि हातोडा असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले.