शिक्षक न् पदवीधर
आगळी निवडणूक
उच्च विद्याविभूषीत
दिसते डोळी चुणूक
सत्तेसाठी आसूसली
न अडमुठअडवणूक
अभद्रअप्रिय प्रथेतून
करायची सोडवणूक
न धन लालच वाटप
संहितेची तुडवणूक
न सत्तेची समीकरणे
गणितांचीजुळवणूक
अश्लील अर्वाच्च ती
रे भाषेचीपिळवणूक
आश्वासनपूर्ण भाषणे
ना स्वार्थी करमणूक
घोडेबाजाराची खोटी
नसावी ती नाडवणूक
ना लोकशाही लक्तरे
ना निघावी मिरवणूक
अपेक्षा निवडणुकीत
नका करु रे तीचं चूक
कशी करे शुध्द निवड
उत्तर मिळो बिनचूक
-हेमंत मुसरीफ, पुणे.